*पंढरपूर सिंहगड मध्ये "शाश्वत जीवनशैलीसाठी एक व्यक्ती म्हणून माझी भुमिका" या विषयावर व्याख्यान संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दि. ५ जुलै २०२४ रोजी "शाश्वत जीवनशैलीसाठी एक व्यक्ती म्हणून माझी भुमिका" या विषयावर याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या व्याख्यानाच्या सुरुवातीस व्याख्याते डॉ. समीर शास्त्री यांचे स्वागत करण्यात आले. हे व्याख्यान ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील ७० हुन अधिक विद्यार्थांनी यामध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यासाठी हा कार्यक्रम स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, आय जी एस स्टुडंट चॅप्टर व सेसा यांच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सुजित राठोड म्हणून काम पाहिले तर कार्यक्रमाचे पाहुणे डॉ. समीर शास्त्री, विधार्थी व सर्व शिक्षकांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार मानले.