कृषी दुतांकडून शेतकऱ्यांना 'फुले अमृतकाळ' मोबाईल ॲपविषयी मार्गदर्शन*

 *कृषी दुतांकडून शेतकऱ्यांना 'फुले अमृतकाळ' मोबाईल ॲपविषयी मार्गदर्शन* 



रत्नाई कृषि महाविद्यालय, अकलूज येथील कृषिदूतांनी निमगांव केतकी येथील शेतकऱ्यांसाठी ‘फुले अमृतकाळ’ मोबाईल ऍपच्या माध्यमातून पशुपालन व्यवस्थापनावर प्रात्यक्षिक आयोजीत केले. या ऍपद्वारे शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायातील जनावरांचे संगोपन, आहार नियोजन, लसीकरण, उष्णता ताण व्यवस्थापन आणि इतर पशुसंवर्धनाविषयी वैज्ञानिक सल्ला मिळतो. हे ऍप मोफत असून मराठी भाषेत उपलब्ध आहे व वापरण्यास सोपे आहे. अनेक शेतकऱ्यांनी या ऍपद्वारे दूध उत्पादन वाढवण्यात तसेच जनावरांची रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यात यश मिळाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत कृषिदुतांनी प्रभावी पद्धतीने प्रात्यक्षिक सादर केले. या उपक्रमामुळे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर पशुपालन क्षेत्रात वाढवण्याचा सकारात्मक संदेश मिळाल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.‌‌ या कार्यक्रमात कृषीदूत स्वप्निल नाईकनवरे, प्रज्योत शिरढोणे, रोहित मगर, विवेक घुले, शेखर टापरे, श्रीराम फडतरे, प्रथमेश दुरगुडे, शिवराज निंबाळकर, गुरुदत्त भोसले यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी‌ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम. चंदनकर आणि विषयतज्ञ प्रा. डी. एस. मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad