स्वेरीत प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्नेहा रोंगे यांचे विशेष मार्गदर्शन सत्र संपन्न ‘सर्वावॉक’ वैक्सीनवर दिली महत्वपूर्ण माहिती


स्वेरीत प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्नेहा रोंगे यांचे विशेष मार्गदर्शन सत्र संपन्न

‘सर्वावॉक’ वैक्सीनवर दिली महत्वपूर्ण माहिती



पंढरपूर - डॉ.बी.पी. रोंगे हॉस्पिटल, पंढरपूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर (ऑटोनॉमस) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरी अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालयांतील शिक्षिका, महिला शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींसाठी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.स्नेहा सुरज रोंगे यांच्या ‘सर्वावॉक (cervavac) कॅन्सर वैक्सीन’ या विषयावरील मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते.

     पुण्याच्या प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात वैद्यकीय अनुभव घेत असताना रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्याच्या हेतूने डॉ.स्नेहा रोंगे यांनी पंढरपूर शहरात ‘डॉ. बी.पी. रोंगे हॉस्पिटल' सुरु केले असून त्या विशेष स्त्रीरोग तज्ञ आहेत. महिलांच्या उपचारासाठी हा दवाखाना रुग्णसेवेसाठी मागील चार वर्षांपासून सज्ज झाला आहे. डॉ.स्नेहा रोंगे या स्वतः एम.बी.बी.एस., एम.एस. (ओबीजीवाय) असून त्यांनी पुणे येथे शिक्षण घेतले आहे. बुधवार, दि. २६ जून,२०२४ रोजी स्वेरीच्या वातानुकुलीत इंटरनॅशनल कॉन्फरन्स हॉलमध्ये महिलांच्या गर्भाशयाच्या आजारासंदर्भात या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते. या सत्रात त्यांनी ‘सर्वावॉक’ लसीवर माहिती दिली. ‘सर्वावॉक (cervavac) ही एक लस आहे जी ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) मुळे होणा-या रोगांपासून संरक्षण करू शकते. जननेंद्रियाच्या वार्त्स- ग्रीवा, व्हल्व्हर तसेच स्त्रियांना इतर आजार असतात. स्त्रियांच्या अशा आणि इतर अनेक आजारावर डॉ. स्नेहा रोंगे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. पुढे बोलताना त्यांनी ‘गर्भाशयाचा कॅन्सर’ म्हणजे काय? तो कधी होतो, हे सांगून यासाठी वयाच्या १५ ते २६ वर्षात मुली अथवा महिला ही लस घेऊ शकतात असे सांगितले. पुढे त्यांनी गर्भपिशवीचा कॅन्सर कशामुळे होतो याबाबत माहिती दिली. या कॅन्सरमु‌ळे जवळपास ७७ हजार रुग्ण दरवर्षी मृत्यू पावतात असे सांगून ही लस कोणी घ्यायची याविषयी माहिती देवून लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच या वैक्सीनच्या विविध प्रकारांबाबत माहिती सांगितली. ‘सर्वावॉक (cervavac) वैक्सीन हे मार्केटमध्ये सहजरीत्या उपलब्ध होत आहे असे सांगून सर्व मुली/महिलांनी त्यांच्या आजूबाजूला या लसीबद्दल जनजागृती करावी असे त्यांनी आवाहन केले. यावेळी अभियांत्रिकीच्या उपप्राचार्य व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. स्वाती पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दिप्ती तंबोळी आदी उपस्थित होते. डॉ. नीता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) च्या समन्वयिका प्रा.मिनल भोरे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad