*पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांचे आषाढी वारीत श्रमदान*
○ राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून श्रमदान: स्तुत्य उपक्रम
पंढरपूर: प्रतिनिधी
आषाढी वारीनिमित्त वाखरी (ता.पंढरपूर) येथे अनेक संताच्या पालख्यासह वारकरी भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित झाल्याने वाखरी पालखी तळावर स्वच्छता राहावी यासाठी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिम हाती घेतली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय म्हणजे आषाढी वारी होय. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यांच्या गैरसोय होऊ नये यासाठी एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वाखरी पालखी तळ स्वच्छ ठेवण्यावर भर दिला आहे.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील १०० हून अधिक विद्यार्थ्यांकडून वाखरी पालखी तळाची स्वच्छता राखण्याचे काम चालू आहे. यादरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेजच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना समन्वय प्रा. चंद्रकांत देशमुख सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग परिश्रम घेत आहे.
फोटो ओळी: वाखरी येथील पालखी तळावर स्वच्छता प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, प्रा. चंद्रकांत देशमुख सह पंढरपूर सिंहगडचे विद्यार्थी.