प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि.१४ जुलै पासुन सुरु स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध



प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि.१४ जुलै पासुन सुरु


स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध



पंढरपूरः 'प्रथम वर्ष इंजिनिअरिंग (पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया रविवार, दि.१४ जुलै २०२४ पासून सुरु झाली असून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. ६२२०) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया बुधवार, दि.२४ जुलै २०२४ (सायं. ५.००) पर्यंत चालणार आहे.' अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.

         महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली स्वेरी अभियांत्रिकी मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, मूळ कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. पदवी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची ही प्रक्रिया दि.१४ जुलै २०२४ पासून ते दि.२४ जुलै २०२४ (सायं.५.०० वा.) पर्यंत चालेल तर कागदपत्रे पडताळणी करून खात्री करणे यासाठी दि. १४ जुलै २०२४ पासून गुरुवार, दि. २५ जुलै २०२४ (सायं.५.०० वा.) पर्यंत मुदत दिली आहे. रजिस्ट्रेशनसाठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत तसेच स्वतःचा मोबाइल/नंबर सोबत असावा. ‘सदरची नोंदणी यशस्वीपणे आणि बिनचूकपणे केलेले विद्यार्थीच शासनाच्या कॅप राऊंडसाठी पात्र राहतील. सदर कॅप राऊंड मधून प्रवेशित विद्यार्थीच शासनाच्या वेगवेगळ्या सवलती घेण्यास पात्र राहतील. त्यामुळे ही प्रवेश नोंदणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून सर्व विद्यार्थी व पालकांनी स्वेरीत येऊन ही प्रक्रिया येथील तज्ञ शिक्षकांमार्फत पूर्ण करून घ्यावी.’ असे आवाहन प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी केले आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अधिष्ठाता प्रा.करण पाटील (९५९५९२११५४) व प्रा. यु.एल.अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad