पंढरपूर सिंहगडच्या कैवल्य देशपांडे यांची तीन कंपनीत निवड

 *पंढरपूर सिंहगडच्या कैवल्य देशपांडे यांची तीन कंपनीत निवड*



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असलेले आटपाडी येथील कैवल्य अजित देशपांडे यांची तीन आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी दिली.

     काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असतानाच कैवल्य अजित देशपांडे यांनी गोदरेज इन्फोटेक, व्हॅल्यु मोमेंटम साॅफ्टवेअर आणि हेक्सावेअर या तीन कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट माध्यमातून मुलाखती दिल्या होत्या.

   यामध्ये गोदरेज इन्फोटेक (वार्षिक पॅकेज ४ लाख), व्हॅल्यु मोमेंटम साॅफ्टवेअर (वार्षिक पॅकेज ४ लाख) आणि हेक्सावेअर (वार्षिक पॅकेज ४ लाख) अशा या तीन कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली आहे. यापैकी पुणे येथील व्हॅल्यु मोमेंटम साॅफ्टवेअर कंपनीत १ एप्रिल २०२४ रोजी रूजू झाले आहेत.

 पुणे येथील व्हॅल्यु मोमेंटम साॅफ्टवेअर हि कंपनी विमाधारकांना आय टी आणि सोल्युशनची सर्वात मोठी स्वतंत्र प्रदाता आहे अशा या कंपनीत कैवल्य देशपांडे यांची निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad