*पंढरपूर सिंहगडचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे व प्रा. सोमनाथ लंबे यांना पेटंट बहाल*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे व त्यांचे पीएच डी चे विद्यार्थी असलेले प्रा. सोमनाथ लंबे यांनी " मेथड अँड डिव्हाइस फोर मॉनिटरिंग फीड डिस्पेन्स इन पोल्ट्री हाऊस" या विषयावर भारत सरकारकडून पेटंट बहाल करण्यात आला आहे.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये कार्यरत असलेले प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पीएच डी चे विद्यार्थी प्रा. सोमनाथ लंबे यांनी सदर पेटंटची निर्मिती केली आहे.
यामध्ये या पेटंट चा उपयोग पोल्ट्री फार्म मधील कोंबडींना किती अन्न टाकण्यात येत आहे याचे मापन होते, पूर्ण एका दिवसामध्ये कीती अन्न टाकण्यात आले याचे मापन डिस्प्ले बोर्ड वरती दिसते, त्यामूळे पोल्ट्री मालकास पक्षाच्या वयानुसार अन्न टाकण्यास मदत होते. या पेटंटचा मोठ्या साइज च्या पोल्ट्री मालकांना खुप फायदा होत आहे.
यामहत्वपूर्ण संशोधनात डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. समीर कटेकर, डॉ. संपत देशमुख आदींचे योगदान लाभले.
या पेटंट बद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले यांच्यासह संस्थेतील सर्व संचालक, पंढरपूर सिंहगड काॅलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.