डॉ. बी.पी.रोंगे, डॉ. प्रशांत पवार व प्रा.बी.डी. गायकवाड यांच्या पेटंटला भारत सरकार कडुन मान्यता स्वेरीच्या संशोधन विभागाची गरुड झेप


डॉ. बी.पी.रोंगे, डॉ. प्रशांत पवार व प्रा.बी.डी. गायकवाड यांच्या पेटंटला भारत सरकार कडुन मान्यता

स्वेरीच्या संशोधन विभागाची गरुड झेप



पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाअंतर्गत असलेल्या वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा.भास्कर गायकवाड यांच्या पेटेंटला भारत सरकारकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे.

       ‘अॅप्रटस फॉर मेजरिंग एलोगेनेशन ऑफ कन्वेर चेन अँड लाईफ इस्टीमेशन देअर ऑफ’ या विषयावर प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार व वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा.भास्कर गायकवाड यांनी या शोध पेटंटची निर्मिती केली आहे. साखर कारखान्यातील अवजड मशीन्समध्ये असलेल्या कन्वेअर चेकच्या टेस्टिंग साठी याचा उपयोग होतो. डॉ. बी.पी. रोंगे, डॉ. प्रशांत पवार व प्रा.बी.डी. गायकवाड यांच्या या पेटंटला भारत सरकार कडुन मान्यता मिळाल्याबद्धल वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा.भास्कर गायकवाड यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व मान्यवर, अधिष्ठाता, विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. संशोधन विभागाच्या प्रगतीचे द्योतक असणाऱ्या या पेटंट मुळे संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार व वर्कशॉपचे इन्चार्ज प्रा.भास्कर गायकवाड यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad