मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामास 99 कोटीचा निधी मंजूर*

 *मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत व निवासस्थान बांधकामास 99 कोटीचा निधी मंजूर*



प्रतिनिधी :

मंगळवेढा येथे तीस खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांचा उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या मागणीची शासनाने दखल घेऊन शंभर खाटांचा उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी 99 कोटी आठ लाख रुपयाचा अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून लवकरच हे काम सुरू होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.


मंगळवेढा शहर व तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या व तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षमीकरण होण्याच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आरोग्यमंत्री ना.प्रा.डॉ.तानाजी सावंत यांचेकडे सदर रुग्णालयाच्या वाढीव खाट क्षमतेसाठी पाठपुरावा व पत्रव्यवहार करुन ही मागणी केली होती. या वाढीव खाटांच्या भौतिक सुविधेमध्ये निरनिराळ्या आजारांवरील १४ तज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्स, इतर कर्मचाऱ्यांचा असा एकूण ३९ नवीन कर्मचारी स्टाफ, सुसज्ज्य आय. सी. यु., ऑपरेशन थिएटर, आदी जिल्हा रुग्णालय पातळीवरील असणाऱ्या सोयी या उपजिल्हा रुग्णालयात मिळणार आहेत.


तालुका आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन व देखरेखखाली अनेक मातांच्या प्रसूती, निरनिराळ्या छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया यासाठी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना खाट उपलब्ध न झाल्याने तासनतास उपचारासाठी ताटकळत आणि वेदना सहन करत प्रतिक्षा करावी लागत होती,परंतु हे रुग्णालय उभारल्यानंतर वाढीव खाट मागणीच्या पूर्ततेमुळे रुग्णांच्या आरोग्य उपचार अडी-अडचणी व समस्या यांना आता पूर्णविराम मिळणार आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad