मंगळवेढा तालुक्यासाठी खरीप हंगामाचा 13 कोटी रुपये पिक विमा मंजूर - समाधान आवताडे*

 *मंगळवेढा तालुक्यासाठी खरीप हंगामाचा 13 कोटी रुपये पिक विमा मंजूर - समाधान आवताडे*




मंगळवेढा/प्रतिनिधी


मंगळवेढा तालुक्यामध्ये पुनर्रचित हवामानावर आधारित खरीप 2023 वर्षासाठीचे खरीप हंगामातील पिकाचे पिकविमे 51 हजार 272 हेक्टर क्षेत्रावर भरले होते त्यातील 47 हजार 80 शेतकऱ्यांना सुमारे 13 कोटी रुपये पिक विमा मंजूर झाला असून लवकरच त्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम वर्ग होणार असल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली आहे.


यामध्ये मध्य प्रतिकूल परिस्थितीत बाजरी पिकासाठी 11 हजार 58 शेतकऱ्यांनी विमा भरला होता त्यातील  10 हजार 106 शेतकऱ्यांना दोन कोटी 59 लाख रुपयाचा पिक विमा खात्यावर जमा झाला असून उर्वरित शेतकऱ्यांचे खाते नंबर आधार कार्डशी संलग्न नसल्यामुळे त्यांना केवायसी केल्यानंतरच हे पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत.त्याचबरोबर वैयक्तिक कंपनी तक्रार केल्यानंतर पंचनामे होऊन नैसर्गिक आपत्ती मधून कांदा तूर मका बाजरी या पिकासाठी 2 हजार 531 शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार केली होती त्या तक्रारदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी 2 कोटी 86 लाख रुपये मंजूर झाले असून तेही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.सी सी इ आधारित 33 हजार 491 शेतकऱ्यांचाही पिक विमा मंजूर झाला असून सात कोटी 31 लाख 70 हजार रुपये मंजूर असून तेही लवकरच खात्यावर जमा होणार आहेत त्याचबरोबर फळपिक विमा योजनेच्या बाबतीतही पाठपुरावा सुरू आहे तरी यावर्षीही सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवून घेणे गरजेचे आहे शासनाने एक रुपयात विमा सुरू केला असून सर्व शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad