*पंढरपूर सिंहगडचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांना पेटंट बहाल*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी "मल्टीमोड इमेज फ्युजन टेक्निक फोर ऑटोमेटेड को रिलेशन आयडेंटिफिकेशन इन मेडिकल इमेजेस" या विषयावर ऑस्ट्रेलियन सरकार कडून पेटंट बहाल करण्यात आला आहे.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये कार्यरत असलेले प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी या पेटंटची निर्मिती केली आहे. या पेटंटमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये इमेज प्रोसेसिंग द्वारे एम आर आय स्कॅन मधील माहिती एकत्रित करून जटिल रोगांचे निदान व उपचार करण्यासाठी मदत मिळू शकते.
या पेटंट बद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले यांच्यासह संस्थेतील सर्व संचालक तसेच पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.