पंढरपूर सिंहगडच्या शुभम सादिगले यांची तीन कंपनीत निवड

 *पंढरपूर सिंहगडच्या शुभम सादिगले यांची तीन कंपनीत निवड*



पंढरपूर: प्रतिनिधी 


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेले पंढरपूर येथील शुभम विनायक सादिगले यांची ३ नामांकित कंपनीत मुलाखती दिल्या होत्या. या तीनही कंपनीत शुभम विनायक सादिगले यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी दिली.

     देशातील व परदेशातील नामांकित कंपन्यांना आवश्यक असलेले परफेक्ट इंजिनिअर हे पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये घडविले जातात. कंपनीला आवश्यक असलेले ज्ञान, गुण यांचा समन्वय साधून महाविद्यालय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण व प्लेसमेंट ची तयारी करून घेते. यामुळेच पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील विद्यार्थी मुलाखती देण्यासाठी सक्षम होऊन यशस्वी होत आहेत. 

   चालू शैक्षणिक वर्षांत काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असतानाच शुभम विनायक सादिगले यांची क्वालिटी किस्को (वार्षिक पॅकेज ५ लाख), कोडिटास (वार्षिक पॅकेज ४ लाख) आणि एमडाॅक्स (वार्षिक पॅकेज ५.३० लाख) अशा तीन कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन पुणे येथील "एमडाॅक्स" हि एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी संप्रेषण, माध्यम आणि वित्तीय सेवा प्रदाता आणि डिजिटल उपक्रमांसाठी साॅफ्टवेअर सेवांमध्ये तज्ञ आहे. अशा कंपनीत जुलै २०२४ मध्ये रुजू होणार असल्याचे शुभम सादिगले यांनी सांगितले.

  शुभम सादिगले यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
✉ tejmaharashtravarta007@gmail.com ➤

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.