पंढरपूर सिंहगड मध्ये शाहू महाराज यांना अभिवादन*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये शाहू महाराज यांना अभिवादन*



पंढरपूर: प्रतिनिधी 


एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये प्रतिवर्षीप्रमाणे बुधवार दिनांक २६ जून २०२४ रोजी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

    शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात 'सामाजिक न्याय दिवस' म्हणून पाळला जातो. याच अनुषंगाने एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सोनंद (ता. सांगोला) येथील माजी मुख्याध्यापक महादेव कोळसे-पाटील, डाॅ. साजिकराव पाटील, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. समीर कटेकर, डाॅ. संपत देशमुख, डॉ. दीपक गानमोटे, प्रा. अभिजीत सवासे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.

   यादरम्यान महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad