*पंढरपूर सिंहगडच्या दोन विद्यार्थ्यांची बल्गेरिया येथे प्रशिक्षणासाठी निवड*
● परदेशातील फेलोशीपसाठी पाठवणारे पंढरपूर सिंहगड सोलापूर जिल्ह्य़ातील एकमेव अभियांञिकी महाविद्यालय
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेले लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथील विश्वजीत सुनिल कस्तुरे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेले मंगळवेढा येथील प्रणव शरद हेंबाडे यांची युरोप येथील बल्गेरिया विद्यापीठामध्ये ४५ दिवसांसाठी प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील दोन विद्यार्थी परदेशातील बल्गेरिया येथे प्रशिक्षणासाठी गेले असुन सोलापूर जिल्ह्य़ातील परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवणारे एकमेव अभियांञिकी महाविद्यालय ठरले आहे.
चालू शैक्षणिक वर्षांतील २०० हून अधिक विद्यार्थ्यांना वेगळ्या मल्टिनॅशनल कंपनीत इंटरशिपसाठी पाठवण्यात आले आहे. प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर आंतराष्ट्रीय नामांकित कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी इंटरशिप फायदेशीर ठरते.
युरोप येथील बल्गेरियाच्या टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ सोफिया येथे इंटरशिप साठी ४५ दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर विविध नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी मिळण्यास फायदा होईल असे मत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. शाम कुलकर्णी यांनी सांगितले.
प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विश्वजित कस्तुरे आणि प्रणव हेंबाडे यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. शाम कुलकर्णी, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.