*पंढरपूर सिंहगड मध्ये "फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम" संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये दिनांक २९ एप्रिल २०२४ ते ४ मे २०२४ या कालावधीत "फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम" आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम ऑनलाईन माध्यमातून मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आयोजित करण्यात आलेल्या "फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम" चे प्रमुख मार्गदर्शक श्रिया ञिपाठी ह्या होत्या. यादरम्यान श्रिया ञिपाठी यांनी "बिल्डिंग गॅप मास्टर इन आर्ट अँड सायन्स ऑफ क्लासरूम कम्युनिकेशन या विषयावर श्रिया ञिपाठी बोलताना म्हणाल्या विद्यार्थी आणि पालक यांच्या मधील संवाद तसेच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील संवाद हा परिणामकारक असणे आवश्यक असल्याचे मत श्रिया ञिपाठी यांनी व्यक्त केले. या मध्ये महाविद्यालयातील ८४ हून अधिक प्राध्यापक वर्ग सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे शिक्षक प्रतिनिधी म्हणून डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी काम पाहिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अनुराधा बिनवडे, प्रा. वैभव गोडसे, प्रा. मिलिंद तोंडसे, प्रा. स्वप्निल टाकळे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.