स्वेरीत ‘प्रॉब्लेम सॉल्विंग थ्रू प्रोग्रामिंग इन सी’ या विषयावर कार्यशाळा संपन्न
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाच्या वतीने ‘प्रॉब्लेम सॉल्विंग थ्रू प्रोग्रामिंग इन सी’ या विषयावर १० दिवशीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. यामध्ये विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रात काम करत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्या कशा दूर करायच्या याबाबत महत्वपूर्ण माहिती देण्यात आली.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली दि.१५ ते दि.२५ एप्रिल, २०२४ या कालावधीत आयोजिलेल्या कार्यशाळेत पुण्यातील सॉफ्टटेक सोल्युशन्स ट्रेनिंगचे आर. एस. स्वामी हे प्रमुख मार्गदर्शन करत होते. प्रमुख पाहुणे स्वामी म्हणाले की, ‘कॉम्प्युटरची सी ही भाषा अत्यावश्यक असून ती प्रक्रियात्मक आणि सामान्य हेतू स्वरूपाची आहे. १९७२ मध्ये शास्त्रज्ञ डेनिस रिची यांनी बेल टेलिफोन येथे युनिक्स ओएस विकसित करण्यासाठी सी भाषा विकसित केली होती. आत्तापर्यंत ‘सी भाषा’ ही ‘जावा’ सोबत सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या संगणकीय भाषांपैकी एक असून जी बहुतेक आधुनिक प्रोग्राममध्ये वापरली जाते. ‘सी भाषा’ वापरण्यासाठी काही अटी आवश्यक आहेत. ही भाषा समजून घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी संगणक प्रोग्रामिंग शब्दावलीची मूलभूत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग भाषेची मूलभूत माहिती समजल्यास ‘सी भाषा’ प्रभावीपणे समजून येईल. यामध्ये कंट्रोल स्टेटमेंट (निर्णय घेणे) त्याचे प्रकार, प्रोग्राम नेस्टेड इफ एलसे स्टेटमेंट, स्विच स्टेटमेंट, लूप फॉर लूप आणि इ.व्हाइल लूप करणे, स्वॅप नंबर, वितर्क प्रकारासह कोणतेही रिटर्न नसलेले फंक्शन, अल्गोरिदम, वर्गीकरण तंत्र निराकरण केलेल्या समस्या, विधानांसह निवड क्रमवारी, निवड क्रमवारी प्रोग्राम तसेच इन्सर्शन सॉर्ट, मर्ज सॉर्ट आणि हीप सॉर्ट सोडवलेल्या समस्या स्टेटमेंटसह बबल सॉर्ट, क्विक सॉर्ट, रॅडिक्स सॉर्ट हीप सॉर्ट सॉल्व्ह केलेल्या समस्या स्टेटमेंट याबाबत माहिती सांगितली. बेसिक टर्मिनॉलॉजीज आणि रिप्रेझेंटेशन्स, बेसिक ट्री टर्मिनोलॉजीज, विविध प्रकारचे ट्री: बायनरी ट्री, ऑपरेशन्ससह बायनरी ट्री, ऑर्डर, प्रीऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर, बँक मॅनेजमेंट प्रोजेक्ट फ्लोचार्टने काही पायऱ्या समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रकल्पाचा फ्लो चार्ट आदी प्रकार’ सांगून त्यांनी सी या भाषेचे महत्व पटवून सांगितले. शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादरीकरण केले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. या कार्यशाळेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विभागातील डॉ.एन.पी. कुलकर्णी, प्रा.आर.बी.पवार यांच्यासह इतर प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.एस.एस.खोमणे यांनी केले तर विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांनी आभार मानले.