*यश म्हणजे पॅकेज नव्हे- प्राचार्य डॉ. कैलाश करांडे*
*पंढरपूर सिंहगड मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचा निरोप समारंभ संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
आयुष्यात असे काही तरी केले पाहिजे की त्यामुळेच आपण इतरांच्या लक्षात राहिले पाहिजे. जिथे जाल तिथं नाव कमवा. इतरांपेक्षा वेगळेपण सिद्ध करता आले पाहिजे. आवडीच्या क्षेत्रात करिअर करा. स्वतःची आवड जपून जीवन जागा. जास्त मोठी नोकरी, पगार म्हणजे यश नसते असे मत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी बोलताना व्यक्त केले.
कोर्टी येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. भालचंद्र गोडबोले, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विनोद मोरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रा. अंजली चांदणे, प्रा. प्रदीप व्यवहारे आदीच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या दरम्यान उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रत्येक वर्षी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातून दिला जाणार बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट पुरस्कार हा नागेंद्रकुमार शिवाजी नायकुडे आणि पल्लवी हनुमंत लोखंडे यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या तसेच नामांकित कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपञ व गुलाब देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सिंहगड कॉलेज व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रद्धा पंदे व भक्ती कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. विनोद मोरे यांनी मानले.