पंढरपूर मध्ये दि. ०८ मे ते दि.१० मे दरम्यान ‘समतावारी सोहळ्या’चे आयोजन संतविचार पीठाचे सचिव व स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांची पत्रकार परिषदेत माहिती

                                                     

पंढरपूर मध्ये दि. ०८ मे ते दि.१० मे दरम्यान ‘समतावारी सोहळ्या’चे आयोजन

संतविचार पीठाचे सचिव व स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांची पत्रकार परिषदेत माहिती 



पंढरपूर- ‘येत्या बुधवारी, दि.०८ मे ते शुक्रवार, दि. १० मे २०२४ दरम्यान पंढरपूर मध्ये ‘समतावारी सोहळ्या’चे आयोजन केले असून या तीन दिवसात संत विचार पीठ च्या माध्यमातून भरगच्च कार्यक्रम राबविले आहे.’ अशी  माहिती संत विचार पीठाचे सचिव व स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी दिली. 

          पंढरपुरातील केबीपी चौक- लिंक रोड लगत असलेल्या ‘हॉटेल स्वाराध्या’ मध्ये आयोजिलेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत संत विचार पीठाचे सचिव व स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे हे संतविचार पीठाच्या या तीन दिवसात होणाऱ्या कार्यक्रमाबाबत माहिती देत होते. संतांच्या विचारावर आधारित पंढरपूर मध्ये ‘संत विचार पीठ’ ही संस्था२०२४. साली स्थापन झाली असून या संतविचार पिठात अनेक अभ्यासू,  संत साहित्य क्षेत्रातील अभ्यासू मंडळी, प्रशासकीय क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक असा मोठा अभ्यासू वर्ग असून संघटनेतील पदाधिकारी व सदस्य संतांच्या विचारांचे प्रचार व प्रसार करीत असून याचे कार्य सर्वदूर पोचले आहे. याच धर्तीवर येत्या बुधवार ते शुक्रवार दरम्यान विविध उपक्रम हाती घेतले आहेत. बुधवार दि. ०८ मे २०२४ रोजी सायं. ५ ते ७ वा. मंगळवेढा मधील श्रीसंत चोखोबाराय यांची पालखी नगरप्रदक्षिणा करणार असून याचे उदघाटन श्री. संत चोखामेळा समाधी, मंगळवेढा चे अध्यक्ष जयराज शेंबडे व सचिव अविनाश शिंदे यांच्या हस्ते तर चोखामेळा व परिवार, चरित्र व समग्र अभंग गाथाचे लेखक डॉ. आप्पासाहेब पुजारी व अॅड. दत्तात्रय तोडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर पंढरपूर मधील स्टेशन रोड लगत असलेल्या तनपुरे महाराज मठात मुक्काम असणार आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवारी, दि. ९ मे रोजी सकाळी ७ ते ९  प्रदक्षिणा रोडवर ‘ग्रंथ दिंडी’ निघणार असून याचे उदघाटन श्रीसंत तनपुरे महाराज ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या हस्ते तर श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनचे उपाध्यक्ष भिमराव रोंगे, श्रमिक सहयोग, चिपळूणचे उपाध्यक्ष भार्गव पवार हे उपस्थित राहणार आहे. त्यानंतर सकाळी ९ ते १० मध्ये लोटस इंग्लिश स्कूल, पंढरपूर मध्ये एकत्र आल्यानंतर १० वा एन.ए.पी.एम., मदर टेरेसा पुरस्कार विजेत्या, समाजसेविका, जेष्ठ विचारवंत मेधाताई पाटकर यांच्या हस्ते लोटस इंग्लिश स्कूल मध्येच संतसाहित्य संमेलनाचे उदघाटन व परिसंवाद कार्यक्रम होणार असून यासाठी श्री. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, पंढरपूरचे अध्यक्ष हणमंत बागल हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तर संमेलनाध्यक्ष म्हणून यवतमाळ मधील जेष्ठ विचारवंत, लेखक व तत्वचिंतक डॉ.अशोक राणा तर संतविचार पीठ, पंढरपूर चे अध्यक्ष ह.भ.प.भारत जाधव महाराज हे स्वागताध्यक्ष राहणार आहेत. तर यासाठी संजय मंगला गोपाळ (मुंबई), विजय दिवाणे (मुंबई) राजन इंदूलकर (चिपळूण) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारी १२.०० ते १.३० पर्यंत सुप्रसिद्ध भारुड गायिका सौ.चंदाताई तिवारी व त्यांच्या सहकाऱ्यांचे भारुड हा लोककला प्रकार सादर होणार आहे. यासाठी जेष्ठ पत्रकार व संपादक शिवाजी शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या भोजनानंतर 'संतांची चळवळ' या ‘धार्मिक व सामाजिक’ या विषयावर पहिला परिसंवाद होणार असून अध्यक्षस्थानी ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज (मुंबई) हे राहणार आहेत तर यामध्ये शामसुंदर मिरजकर (मायणी), ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर महाराज (सांगोला), ह.भ.प. सुहास फडतरे महाराज (कोरेगांव) यांची उपस्थिती असणार आहेत तर संवादक म्हणून स्वेरीचे प्रा. डॉ. यशपाल खेडकर हे राहणार आहेत. त्यानंतर सायं. ४.०० ते ६.०० केले असून ‘साने गुरुजी व संतविचार’ या विषयावर दुसऱ्या परिसंवादाचे आयोजन केले आहे. यासाठी अध्यक्ष म्हणून ह.भ.प. देवदत्त परुळेकर महाराज (वेंगुर्ला) तर यात डॉ. राजेंद्र कुंभार (जयसिंगपूर), श्रीरंग गायकवाड (पुणे) व प्रा. स्वामीराज भिसे (पुणे) यांनी सहभाग घेतला आहे. यासाठी संवादक म्हणून शिवाजी शिंदे (पंढरपूर) हे काम पाहणार आहेत. सायं. ७.०० ते रात्री ९ वा. ‘पुज्य साने गुरुजी प्रेमी मंडळी’ यांची ह.भ.प. श्रीसंत तनपुरे महाराज मठ, पंढरपूर मध्ये समन्वय व आढावा बैठक आयोजित केले असून यामध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवार, दि. १० मे २०२४ रोजी सकाळी ७.वा. नामदेव पायरी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, महाद्वार, पंढरपूर येथे ‘समतेचा जागर’ (भजन, गीत व घोषणा इ.) आणि श्री. संत चोखोबाराय यांचा श्री. पांडुरंग दर्शन सोहळा त्यानंतर सकाळी ८ ते ८.३० पर्यंत श्रीसंत कैकाडी महाराज मठ, पंढरपूर येथे एकत्रित आल्यानंतर श्रीसंत कैकाडी महाराज विश्वपुण्यधाम मंदीर, पंढरपूर येथे सकाळी ८.३० ते १०.३० ह.भ.प. भारत जाधव महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ‘संतविचार आणि अस्पृश्यता निवारण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले असून यामध्ये प्रा. डॉ. अरुण शिंदे (कोल्हापूर), ह.भ.प. नितीन सावंत महाराज (परभणी), ह.भ.प. अभय जगताप महाराज (पुणे) यांचा सहभाग असणार आहे यासाठी संवादक म्हणून सारंग कोळी (पंढरपूर) हे काम पाहणार आहेत. सकाळी १०.३० ते १२ दरम्यान डॉ.अशोक राणा (जेष्ठ विचारवंत, लेखक व तत्व चिंतक) यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ होणार असून यासाठी दत्तात्रय कोंडलकर, सदाशिव मगदूम (मिरज), वसंत एकबोटे (नाशिक) यांच्यासह संतविचार पीठातील पदाधिकाऱ्यांसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संतसाहित्य संमेलनाचे आयोजन श्री. संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्ट, पंढरपूर, श्रीसंत कैकाडी महाराज विश्व पुण्यधाम मंदीर, पंढरपूर, साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, वडघर, मानगांव, संतविचार पीठ, पंढरपूर, श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, पंढरपूर व श्रमिक सहयोग, चिपळून यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी अधिक माहितीसाठी ह.भ.प. भारत जाधव (मो. ९०११०९७९७९), ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर (मो. ८४५९२१२०२५), दादासाहेब रोंगे (मो.८००७५५३०००), राजेंद्र अवसक (मो. ९०२८२२१७१७), सारंग कोळी (मो. ९०९६९१३८४९), निशिकांत परचंडराव (मो. ९९६०३०५२५२) व शिवाजी शिंदे (मो. ९०११०९५७११) यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन संतविचार पीठ, पंढरपूर च्या वतीने करण्यात आले आहे. तरी संत साहित्यातील प्रेमींनी यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेसाठी संतविचार पीठाचे अध्यक्ष ह.भ.प. भारत जाधव महाराज, खजिनदार सारंग कोळी, आणि कार्यकारी सदस्य शिवाजीराव शिंदे हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad