*शिक्षण घेत असताना आनंदी आयुष्य जगा- प्राचार्य डॉ. कैलाश करांडे*
○ पंढरपूर सिंहगड मधील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
यशस्वी होण्यासाठी सर्व गुण संपन्न असावे लागते. यापुढील आयुष्यातील संघर्षमय जीवनातील प्रवास खडतर आहे. जबाबदारी अंगावर पडत असते. त्या दृष्टीनेच तुमची वाटचाल असली पाहिजे. यापुढील जीवनाचा प्लॅन करा अन् त्यानुसार वाटचाल करा. जेवढा खडतर प्रवास तेवढे जास्त तुम्ही यशस्वी होत असतात. जेवढ्या लवकर जबाबदारी स्विकारचाल तेवढ्या लवकर यशस्वी व्हाल. स्वतःचे करिअर करण्याकडे लक्ष देण्याचे आश्वासन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी यादरम्यान बोलताना व्यक्त केले.
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शनिवार दिनांक ४ मे २०२४ रोजी चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. सुभाष पिंगळे, प्रा. नामदेव सावंत, प्रा. सुमित इंगोले, विद्यार्थिनी कुमारी गायञी महाजन यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यादरम्यान काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनी कुमारी गायञी महाजन यांचे प्रा. नामदेव सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमात काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मनोगत व्यक्त केले.
या वर्षीचा काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट म्हणून विनोद आसबे यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. सुभाष पिंगळे यांनी संबोधित करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या देशमुख व श्रृती दिवटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सुमित इंगोले यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.