*पंढरपुर सिंहगडच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील स्वरूप धोकटे बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शनिवार दिनांक ४ मे २०२४ रोजी चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्रीगणेश कदम, डाॅ. चेतन पिसे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळेस सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी यादरम्यान मनोगत केले. या वर्षीचा सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट म्हणून स्वरूप धोकटे यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय गेट परीक्षेत यश प्राप्त केल्याबद्दल विशाल मोरे यांचा प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्राप्ती वेळापुरकर व कुमारी आरती ढेरे तर उपस्थितांचे आभार डाॅ. श्रीगणेश कदम यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.