पंढरपुरात सो.क्ष.कासार समाजातर्फे श्री.कालीका देवी उत्सव मोठ्या थाटात संपन्न समाजाच्या सांघिक परिश्रमामुळे मिरवणुकीत मोठे यश


पंढरपुरात सो.क्ष.कासार समाजातर्फे श्री.कालीका देवी उत्सव मोठ्या थाटात संपन्न

समाजाच्या सांघिक परिश्रमामुळे मिरवणुकीत मोठे यश




पंढरपूर- येथील सो.क्ष. कासार समाजाच्या वतीने श्री.कालीका देवी उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. ‘एक दिवस समाजासाठी’ या आवाहनास प्रचंड प्रतिसाद देऊन पंढरपूर मधील सर्व समाज बांधव, भगिनी व जेष्ठ समाज बांधव उपस्थित राहून श्रींचा उत्सव यशस्वीरित्या साजरा केला. 

              सकाळी ७ वा. श्री.कालीका मातेची महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री.कालिकादेवी चौक पासून श्री.कालीका माता देवीच्या प्रतिमेची मिरवणूक निघाली. काळा मारुती, चौफाळा, नाथ चौक, घोंगडे गल्ली व कासार गल्ली येथे तडफदार वादनाने सारा आसमंत दणाणून गेला. मिरवणूकीच्या वेळी ठिकठिकाणी समाजबांधवांतर्फे सरबत, रसना, फ्रुटी, कुल्फी, कोकम वाटप करण्यात येत होते. यावेळी बारामती मधील नटराज बॅंजो पार्टीच्या वादनाने मिरवणुकीतील सर्व समाज बांधव, भगिनी व जेष्ठ समाज बांधव, महिला, मुली, युवकांचा उत्साह यात कुठेही कमी होत नव्हता. मिरवणुकीच्या माध्यमातून पंढरपूर करांना सामाजिक एकीचे दर्शन दिसून आले. श्री.कालिका मातेची भव्यदिव्य मिरवणूकीत सुरूवाती पासूनच समाजातील स्त्री पुरूषांची उपस्थिती लक्षणीय होती. महिला हया आकर्षक केसरी रंगाच्या जरदारी साडीत आणि पुरुष हे पांढरे शुभ्र पेहराव व केसरी टोपी मध्ये भारदस्त वाटत होते. मिरवणूकी दरम्यान उन्हाची तमा न बाळगता सर्वजण मोठ्या उत्साहात व आनंदात सहभागी झाले होते. मिरवणूक जसजशी पुढे जात होती तशतशी मुले, महिला, जेष्ठ नागरिक, अबाल वृद्ध यांची संख्या वाढत होती.तसेच मिरवणूक मंदिरात आल्यावर सामुदायिक महाआरती करण्यात आली व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व समाजबांधव भगिनींनी दुपारी मंदिरात महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी श्री कालिका महिला भजनी मंडळातर्फे सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम पार पडला, राष्ट्रीय पुरस्कार विजेते, सुप्रसिद्ध व्याख्याते, निसर्गोपचार तज्ञ श्री. स्वागत तोडकर यांच्या हसत-खेळत घरगुती उपचार पद्धतीने 'औषधाविना आरोग्य' कसे जगावे?’ या विषयावर भव्य दिव्य अशा व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या सदाबहार वक्तृत्व शैलीतून नैसर्गिक उपचार पद्धती तसेच आपल्या व्यस्त जीवनशैलीतून नेहमी हसत खेळत राहून आपले जीवन आनंदी बनवू शकतो हा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. 'जो हसतमुखी तो सदा सुखी' हा आरोग्याचा मूलमंत्रच त्यानी उपस्थितांना दिला, त्याचबरोबर विविध घरगुती नैसर्गिक उपचार पद्धतीने आपण औषधाविना आरोग्य जगू शकतो ही दृढभावना लोकांच्या मनात निर्माण केली. हजारोंच्या संख्येत उपस्थित समुदायानेही त्यांच्या उपयुक्त माहितीला भरभरून प्रतिसाद दिला. अशा प्रकारे अतिशय उत्साहात आणि आरोग्यमय वातावरणात संपन्न झाली. याला समाजबांधवांनी भरघोस प्रतिसाद दिला. श्री.कालिकामातेची गाभाऱ्यातील फुलांची आरास यामुळे मंदिरातील वातावरण अधिक प्रसन्न जाणवत होते. उत्सवाच्या आदल्या दिवशी म्हणजे दि. ३० एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत आयोजिलेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त सहकार्य मिळाले. यामध्ये समाजबांधव व मित्रमंडळी यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. हा उत्सव यशस्वी होण्यासाठी श्री.कालीका देवी संस्थांनचे कार्यकारी मंडळ, युवक मंडळ व महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले. एकूणच हा संपूर्ण कार्यक्रम बहारदार झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad