इतरांपेक्षा आयुष्यात काहीतरी वेगळे करा- डाॅ. कैलाश करांडे* *○ पंढरपूर सिंहगड च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात निरोप समारंभ*

 *इतरांपेक्षा आयुष्यात काहीतरी वेगळे करा- डाॅ. कैलाश करांडे*


*○ पंढरपूर सिंहगड च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात निरोप समारंभ*



पंढरपूर: प्रतिनिधी 


यश मिळवायचे असेल तर कष्ट करावे लागेल. कष्टात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. इतरांपेक्षा आयुष्यात काही तरी वेगळे केले पाहिजे. जीवनात स्वप्न बाळगा. ते पुर्ण करण्यासाठी धडपड करा. स्वतःला झोकून देऊन करिअर करा असे मत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी बोलताना व्यक्त केले.

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये गुरुवार दिनांक ९ मे २०२४ रोजी मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील शेवटच्या वर्षात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, प्रा ऋषिकेश देशपांडे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

     या कार्यक्रमात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

   या कार्यक्रमात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दरवर्षी दिला जाणार बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट पुरस्कार यावर्षी संदीप क्षीरसागर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपञ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

   या दरम्यान चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मनोगत व्यक्त केले.

   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या नाळे व अश्विनी पवार यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. ऋषिकेश देशपांडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.