*पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात निरोप समारंभ संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये गुरुवार दिनांक ६ मे २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील शेवटच्या वर्षात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. भालचंद्र गोडबोले आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमात डॉ. भालचंद्र गोडबोले, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दरवर्षी दिला जाणार बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट पुरस्कार यावर्षी आर्यन नागटिळक यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपञ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या दरम्यान चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिहान धारूरकर व ओंकार लेंगरे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. स्वप्नील टाकळे यांनी मानले.