पंढरपूर सिंहगड मध्ये "रीसेंट ट्रेंड्स इन आय ओ टी" या विषयावर गेस्ट लेक्चर संपन्न*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये "रीसेंट ट्रेंड्स इन आय ओ टी" या विषयावर गेस्ट लेक्चर संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग तसेच स्टुडंट असोसिएशन (ई टी ई एल एस ए) यांच्या संयुक्त विद्यमाने "रीसेंट ट्रेंड्स इन आय ओ टी" या विषयावर शुक्रवार दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी गेस्ट लेक्चर मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

     या कार्यशाळेमध्ये रोहित दणके यांनी सध्याच्या युगात इंटरनेट ऑफ थिंगचे महत्व , त्याचे कार्य आणि प्रोग्रामिंग कसे करायचे याविषयी प्रत्यक्षात प्रात्याक्षिक करून दाखवले.

  यावेळेस बोलताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले की, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व नोकरीत संधी मिळण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग म्हणून असे कार्यक्रम नेहमीच महाविद्यालयात आयोजित केले जातात. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ. कैलाश करांडे यांनी या दरम्यान बोलताना व्यक्त केले.

  या कार्यक्रमाअंतर्गत तृतीय वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. नितिन खपाले, प्रा.स्वप्नील टाकळे सह विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून संध्या पाटील यांच्यासह इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad