*पंढरपूर सिंहगड मध्ये "वर्ल्ड डिजिटल डिटाॅक्स डे" मार्गदर्शन*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये जागतिक "वर्ल्ड डिजिटल डिटाॅक्स डे" निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण मंगळवार दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी प्रमुख पाहुण्या वैशाली चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या वैशाली चव्हाण यांचे
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
"वर्ल्ड डिजिटल डिटाॅक्स डे" निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत कुमारी वैष्णवी पांडुरंग पडगळ आणि द्वितीय क्रमांक कुमारी वैष्णवी श्रीमंत बनकर यांनी रोख स्वरूपात रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यादरम्यान सोशल मिडीयाचा कमी वापर करण्याची शपथ घेण्यात आली. तसेच कार्यक्रमात पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज व झेप फाऊंडेशन यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना वैशाली चव्हाण यांनी "वर्ल्ड डिजिटल डिटाॅक्स डे" बद्दल महत्वपूर्ण माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
या कार्यक्रमाचे सुञसंचालन कुमारी गीता नवले आणि श्रेया सुपेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. अभिजित सवासे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.