डब्ल्युआयटी मधील ‘विचार-२४’ या स्पर्धेमध्ये स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे यश स्वेरीत संशोधन विभागाला मिळतेय गती


डब्ल्युआयटी मधील ‘विचार-२४’ या स्पर्धेमध्ये स्वेरीच्या विद्यार्थ्यांचे यश

स्वेरीत संशोधन विभागाला मिळतेय गती



पंढरपूर- सोलापुर येथील वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (डब्ल्युआयटी) मध्ये दि. २२ व २३ मार्च रोजी झालेल्या ‘विचार-२४’ या राष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक परिसंवाद स्पर्धेत स्वेरीच्या दोन विद्यार्थ्यांना उत्तुंग यश मिळाले. तेथील स्पर्धेमध्ये आपल्या प्रोजेक्टचे सादरीकरण करून या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. स्वेरीमध्ये शिक्षणाबरोबरच संशोधनावर देखील अधिक भर दिला जात असून विद्यार्थीही संशोधनामध्ये रस घेऊन यश संपादन करत आहेत. नवनवीन प्रकल्प निर्मितीकडे स्वेरीतील विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. आता या पुरस्काराने स्वेरीतील संशोधन विभागाला आणखी गती मिळाली आहे, हे मात्र नक्की !  

       ‘विचार २४’ या तांत्रिक परिसंवाद स्पर्धेमध्ये गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेणारे सत्यजित विठ्ठल गोफणे व द्वितीय वर्षात शिक्षण घेणारे चैतन्य लक्ष्मण सोनवणे यांनी ऑटो डिस्क कंपनी प्रायोजक असलेल्या ‘युनिव्हर्स डिझाईन चॅलेंज’ या इव्हेंट मध्ये प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत दोघांनी मिळून ड्रोन वरील इमर्जन्सी रिस्पॉन्स ड्रोनचे मॉडेल बनविले. याद्वारे आपत्कालीन परिस्थितीमध्ये ड्रोनच्या साह्याने बचाव कार्य, वैद्यकीय सेवा पुरवठा व थ्रीडी मॅपींग अशी तीन कार्ये एकाच ड्रोनच्या माध्यमातून करण्यासाठी त्यांनी नवीन उपकरण तयार करून दाखविले. अत्यंत नवीन प्रकारे हा प्रकल्प बनविल्यामुळे या प्रकल्पाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सत्यजित गोफणे व चैतन्य सोनवणे यांना रोख रू. १२ हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तेथील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दोघांना संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे, विभागप्रमुख डॉ.एस.बी.भोसले, प्रा.पी. बी.आसबे तसेच विभागातील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे सत्यजित गोफणे व चैतन्य सोनवणे यांचा संस्थेच्या वतीने संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांच्या हस्ते विठ्ठल गोफणे, सौ. पल्लवी गोफणे, डॉ. एस.एस. वांगीकर, डी.टी.काशिद व इतर प्राध्यापकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तांत्रिक परिसंवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी सत्यजित गोफणे व चैतन्य सोनवणे यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad