*पंढरपूर सिंहगड मध्ये "रिसेन्ट ट्रेन्डस इलेक्ट्रिकल पाॅवर सिस्टीम" या विषयावर ऑनलाईन वेबिनार संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय आणि तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेबिनार आयोजित करण्यात आला होता. हा वेबिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या वेबिनार मध्ये प्रा. अमित सोळंकीयांनी ( सहायक प्राध्यापक, विद्युत अभियांत्रिकी विभाग, जेएसपीएम अभियांत्रिकी तंत्रज्ञान आणि संशोधन महाविद्यालय, वाघोली पुणे) इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टममधील अलीकडील ट्रेंड यबद्दल साखोल ऑनलाइन गुगल मीट द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हा वेबिनार बुधवार दिनांक १७ एप्रिल २०२४ या दिवशी संपन्न झाला या वेबिनार चा फायदा विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाचा प्रकल्प, मिनी हार्डवेअर प्रकल्प साठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. याचबरोबर विद्युत ऊर्जा निर्मिती विविध पद्धती यब्दल साखोल मगरदर्शन केले. या वेबिनार साथी विद्युत विभाग १५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख प्रा.व्ही.पी मोरे , कार्यक्रम समन्वयक प्रा.एन. व्ही. खांडेकर, प्रा. डी.एम. कोरके ,सत्यवान वसेकर सह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.