*पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांची "जलशुद्धीकरण केंद्राला" भेट*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी पंढरपूर येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन माहिती घेतली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी जलशुद्धीकरण प्रक्रियेबद्दल सर्व माहिती जाणून घेतली तसेच त्यासाठी लागणारे उपकरणे, रसायने व प्रक्रिया याबद्दल माहिती संग्रहित केली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नास समर्पक उत्तरे उपस्थित अधिकारी जाधव यांनी दिली त्याबद्दल सर्वानी त्यांचे आभार मानले.
याशिवाय पाणीपुरवठा प्रकल्पाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र आहे. निसर्गात उपलब्ध असलेल्या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून ते वापरण्यालायक करण्याचे मुख्य काम जलशुद्धीकरण केंद्रात केले जाते. घरगुती वापर, औद्योगिक वापर इत्यादींसाठी आवश्यक असलेली पाण्याची शुद्धता येथे उत्पन्न करून ती सातत्याने राखली गेल्यामुळे नागरिकांचे आरोग्य, औद्योगिक प्रत उच्च दर्जाची रहाते. हे साध्य करण्यासाठी प्रत्येक केंद्रामध्ये शुद्धीकरण करणाऱ्या प्रत्येक यंत्रणेची सविस्तर माहिती रेखाचित्रांसह उपलब्ध असते याबद्दल पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
हि भेट यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, प्रा. चंद्रकांत देशमुख आदींसह सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.