स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला मुंबईच्या आय ट्रिपल ई कडून कांस्य पदक



स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला मुंबईच्या आय ट्रिपल ई कडून कांस्य पदक



पंढरपूर- इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आय ट्रिपल ई) ही एक व्यावसायिक संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक हे अभियांत्रिकी शिक्षणावर आधारित वेगवेगळे संशोधन, प्रोजेक्ट्स, वेबिनार, परिषदा आदी मध्ये सहभागी होवून आपल्या अंतर्गत गुणांना चालना देत असतात. याचाच एक भाग म्हणून स्वेरीला मुंबईच्या आय ट्रिपल ई कडून कांस्य पदक देवून गौरविण्यात आले. या यशाबद्दल स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

       गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१६ मध्ये आय ट्रिपल ई स्टुडंट ब्रांच स्थापन करण्यात आली. २०१६ ते २०२४ या काळात स्वेरीने विविध तांत्रिक उपक्रम राबविले. यामध्ये स्वेरीच्या व इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन व आपल्या कल्पकतेतून अनेक पारितोषिके मिळवली. नुकत्याच पार पडलेल्या ‘टेक्नोव्हेशन २के२४’ या राज्यस्तरीय तांत्रिक संशोधन स्पर्धेमध्ये स्वेरीच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले होते. आय ट्रिपल ई ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या तांत्रिक कौशल्यांचा विकास करून आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन देत असते. यातूनच नवीन उद्योजक व व्यावसायिक निर्माण होवून विकासाला हातभार लागावा या हेतूने आय ट्रिपल ई चे कार्य सुरु आहे. सातत्याने या संदर्भात काम केल्यामुळे स्वेरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजला हे कांस्यपदक मिळाले. सदर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम बांद्रा, कुर्ला येथील मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या कॉम्प्लेक्स मध्ये संपन्न झाला. स्वेरीच्या वतीने विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती व शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मोहन ठाकरे यांनी अय्यपन पिल्लई यांच्या हस्ते हे कांस्यपदक स्वीकारले. कांस्यपदक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. स्वेरी अभियांत्रिकी कॉलेजच्या आय ट्रिपल ई ‘स्टुडंट ब्रांच’ मध्ये अध्यक्षा सानिका चांदगुडे, उपाध्यक्षा सेजल धोत्रे, खजिनदार संस्कार भारती, वेबमास्टर सुहास माळी, सचिव नेहा सोमवंशी व समन्वयक म्हणून प्रा.स्मिता गावडे यांनी काम पाहिले. कांस्यपदक मिळविल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.डी.ए.तंबोळी, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी सर्वांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad