🟣 *या देशात भाजपने द्वेष पसरवण्याशिवाय कुठले काम केले नाही. :- निरंजन टकले*
🔵 *येणारी निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही ची आहे, पंढरपूरवासीयांनी लोकसभा निवडणुकीत लोकशाही टिकविण्यासाठी काँग्रेसला निवडून द्या असे आवाहन सुशीलकुमार शिंदे यांनी केले.*
पंढरपूर, दिनांक : १९ मार्च २०२४
*सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहर - तालुका काँग्रेस कमिटी, इंडिया आघाडीच्या वतीने पंढरपूर शहर - तालुका INDIA आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी, संत तनपुरे महाराज मठ येथे दुपारी ०३:०० वाजता, कार्यकर्ता संकल्प सभा मेळावा, मार्गदर्शन शिबिराचे आयोजित केले होते. या संकल्प सभेत न्यायाधीश लोया यांचा खुनी कोणी केला याची चिरफाड करणारे, नोटाबंदी , इलेक्ट्रॉल बाँड यासारख्या अनेक विषयांवर अभ्यास करून जनतेसमोर सत्य मांडणारे, धाडशी, परखड, प्रवाहाच्या विरुद्ध हुकूमशाहीच्या थोबाडात मारणारे प्रख्यात शोध पत्रकार श्री. निरंजन टकले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केले.*
राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक केले.
या संकल्प सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, सो. शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे, पंढरपूर शहर अध्यक्ष अमर सुर्यवंशी सो. शहर कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, पंढरपूर राष्ट्रवादीचे प्रमुख सुभाष भोसले, सुधीर भोसले, बाळासाहेब शेख, प्रकाश पाटील, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष महादेव पाटील, युवक जिल्हा अध्यक्ष सूनंजय पवार, नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, विनोद भोसले, गणेश डोंगरे, संदीप पाटील, संदीप शिंदे, मिलिंद मोलाने, नितीन शिंदे, सुशील बंदपट्टे, गणेश माने, सागर कदम, सुदीप पवार,शिवकुमार बावलेकर, देवानंद इरकल, तिरुपती परकीपंडला, राजश्री लोलगे, राहुल पाटील यांच्यासह हजारो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.