स्वेरीच्या 'इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ या विभागाचा पालक मेळावा संपन्न


स्वेरीमुळे पाल भविष्य उज्ज्वल 

                                                                                 -सेवानिवृत्त शिक्षक सुरेश काळे

स्वेरीच्या 'इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ या विभागाचा पालक मेळावा संपन्न



पंढरपूर– ‘माझा थोरला मुलगा रोहित हा स्वेरी च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून उत्तीर्ण होऊन पुण्यात सध्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये जॉब करत आहे. त्याची अभ्यासात झालेली प्रगती पाहून कन्या रोहिणी व धाकटा मुलगा दिग्विजय या दोघांनाही स्वेरीमध्येच ऍडमिशन घेण्याचे ठरविले आणि इलेक्ट्रिकल विभागांमध्ये प्रवेश घेतला. गत तीन वर्षात त्यांचाही अभ्यास उत्तम प्रकारे चालला असून त्यांच्या गुणवत्तेत व संस्कारात देखील प्रगती झालेली दिसून येत आहे. एकूणच डॉ. बी.पी.रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये प्रत्येकांकडून पहिल्या क्षणापासून सहकार्य मिळत आहे. म्हणून आम्ही पालकवर्ग निश्चिंत आहोत. आमच्या पाल्यांची सर्वांगीण प्रगती पाहता स्वेरीमुळे आमच्या पाल्यांचे करिअर उज्वल होत आहे.’ असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक सुरेश काळे यांनी केले.

         गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ या विभागातर्फे आयोजिलेल्या पालक मेळाव्यात सेवा निवृत्त शिक्षक सुरेश काळे हे अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.डी.ए.तंबोळी यांच्या नेतृत्वाखाली या पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी महिला पालक प्रतिनिधी सौ.मनीषा चव्हाण हया उपस्थित होत्या. प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ.डी.ए तंबोळी यांनी महाविद्यालयाअंतर्गत असलेल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील अभ्यासक्रम, उपक्रम, इफेक्टिव टिचिंग-लर्निंग, संशोधन व त्यासाठी मिळालेला निधी, पेटंट, इंटरप्रेन्युरशिप, उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग, उपलब्ध साहित्य सामग्री, कामाचे स्वरूप, इलेक्ट्रिकल वाहनांमध्ये होत असेलेली वाढ, शिक्षणाची मुल्ये आदी बाबत महत्वपूर्ण माहिती दिली. ट्रेनिंग व प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा.ए.ए.मोटे यांनी प्लेसमेंटसाठी कोणती तयारी करून घेतली जाते, तसेच विद्यार्थ्यांना मोठमोठ्या पॅकेजच्या कंपन्या कशा मिळतात, हे सांगून पालक म्हणून कोणती भूमिका घ्यावी लागेल व यासाठी विशेष कोणती तयारी करावी लागते? इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जागतिक बाजारपेठेत वाढते महत्व, विविध कंपन्या, कोअर कंपन्या, या महत्वाच्या विषयांची माहिती सांगून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी पालकांनी कोणती जबाबदारी घेतली पाहिजे यावर देखील महत्वाची माहिती दिली. वसतिगृह व्यवस्थापक प्रा.के.बी. पाटील म्हणाले की, ‘पालकांनी वेळोवेळी आपल्या पाल्यांच्या प्रगतीबाबत त्यांच्या वसतिगृहातील वेळेच्या नियोजनाबाबत सतर्क असावे. तसेच महाविद्यालयात मोबाईल वापरण्यास बंदी आहे पण वसतिगृहात मात्र पाल्यांनी मोबाईलचा वापर कमीत कमी करावा. मोबाईलपासून दूर राहिल्यास आपला पाल्य अधिक जागरूक राहून गंभीरपणे अभ्यास करू शकतो.’ असे सांगून वसतिगृहातील शिस्तीबाबतची माहिती दिली. महिला पालक प्रतिनिधी सौ.मनीषा चव्हाण म्हणाल्या की, ‘स्वेरी सारखे महाविद्यालय जिल्ह्यात कोठेही नसून स्वेरीचा अभ्यासाबाबतचा पाठपुरावा व नियमित करून घेत असलेल्या अभ्यास व यातील सातत्य त्यामुळे आमची मुले, मुली यशस्वी होत आहेत. त्यामुळे आम्ही पालक वर्ग स्वेरीच्या नियोजनावर समाधानी आहोत.’ असे सांगून पालक वर्ग निश्चिंत राहण्याची कारणे सांगितली. यावेळी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या एकूण २३ विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तु देवून सत्कार करण्यात आला.पालक मेळाव्यानंतर पालकांनी आपल्या पाल्याचे वर्गशिक्षक, संबंधित शिक्षक व विभागप्रमुख यांच्या भेटी घेवून पाल्याच्या प्रगतीबाबत विचारणा करून अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी अनगरचे माजी सरपंच व उद्योजक भाऊराव इंगळे, पत्रकार नवनाथ खिलारे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर असे मिळून जवळपास १२५ च्या आसपास पालक व  स्वेरीचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मोहन ठाकरे,  प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा. डी.डी. डफळे यांनी केले तर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. व्ही.ए. सावंत यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad