*पंढरपूर सिंहगड मध्ये "माजी विद्यार्थी मेळावा" उत्साहात संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
दरवर्षी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज माजी विद्यार्थ्यांसाठी मेळावा आयोजित करत असुन या मेळाव्यात माजी विद्यार्थी त्यांच्या महाविद्यालयीन दिवसातील क्षण आणि आठवणी जपतात आणि त्या आठवणी या मेळाव्यात शेअर करण्याची संधी उपलब्ध होत असते. हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये रविवार दिनांक १७ मार्च २०२४ रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याची सुरुवात उपप्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ.श्याम कुलकर्णी, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. श्रीगणेश कदम, प्रा. विनोद मोरे, इस्टेट मॅनेजर प्रा. रोहन नवले, माजी विद्यार्थी प्रतिनिधी अविनाश शिंदे, सोनाली सोनवले आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डाॅ. समीर कटेकर यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक आढावा उपस्थितीतांसमोर मांडला.
दरम्यान माजी विद्यार्थ्यांनी नोकरी करत असलेल्या ठिकाणची बाजार परिस्थिती, कामाची परिस्थिती, नवीन तंत्रज्ञानाच्या संधी, अतिरिक्त कौशल्य संच, करिअर पर्याय इत्यादींबाबत विद्यार्थ्यांसोबत त्यांची मते मनोगतात व्यक्त केली. काॅलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी सामायिक केलेल्या समुदायाच्या आणि अभिमानाच्या दृढ भावनेची पुष्टी करणारा हा मेळावा खरोखरच सर्वांसाठी एक संस्मरणीय अनुभव होता.
विशेष म्हणजे या मेळाव्यात परदेशात नोकरी करत असलेले माजी विद्यार्थी ही ऑनलाईन सहभागी झाले होते. ऑनलाईन सहभागी होऊन त्यांनी मनोगत व्यक्त केले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी राजाराम राऊत, अमोल नवले, प्रभाकर शिंदे, सतिश नवले सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन अभिषेक देवरे आणि आकांक्षा घोलप यांनी केले तर उपस्थितांटे आभार तेजस्विनी खांडेकर व शुभम जोशी यांनी आभार मानले.