राज्यस्तरीय शोध प्रकल्प स्पर्धेत स्वेरीचे घवघवीत यश
स्वेरीतील विद्यार्थ्यांच्या दोन प्रकल्पांना प्रथम क्रमांक
पंढरपूर- मुंबईच्या डॉ. होमी ज.भाभा नगरमधील तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये दि.७ ते १० मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रदर्शन व विविध मॉडेल्सच्या शोध प्रकल्पावरील ‘डीफेक्स-२०२४’ या प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक)च्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. स्वेरीमध्ये संशोधन विभागाचे कार्य भक्कमपणे सुरु असताना पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे स्वेरीच्या संशोधन कार्याला नवीन झळाळी प्राप्त झाली आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांसोबत पदविका अभियांत्रिकी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील या संशोधन कार्यातून एक नवी दिशा मिळत आहे. हे मात्र नक्की !
‘ग्रीन शेल्फ फॉर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल’ या विषयावर सादर केलेल्या शोध प्रकल्पात डिप्लोमाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले आदित्य संजय जगदाळे, मिहीर मकरंद पटवर्धन, अजिंक्य पांडुरंग शिंदे, पार्थ प्रविण घुंघुर्डे या विद्यार्थ्यांना शोध अवॉर्ड मिळाला तर त्याच स्पर्धेत इंडस्ट्रियल ऑटोमेशन विभागात मयुरी महेश चव्हाण, प्रांजली महादेव कवडे, काजल सिद्धेश्वर गुळमे व शिवानी संजय कांबळे या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी ‘स्लॉट लेस ब्रशलेश डीसी मोटार’ या प्रकल्पात घवघवीत यश मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी प्रथम क्रमांकाचे रोख १० हजार रु., स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. मागील वेळी याच स्पर्धेत स्वेरीच्या दोन ग्रुपला द्वितीय क्रमांक मिळाला होता. स्वेरीत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए.पी. केने, डिप्लोमाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा. पी.एस. वलटे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा. एस.एम. घोडके, प्रा. एस. पी. मोरे, प्रा. एस.व्ही.पवार, प्रा. के.एस. पुकाळे यांच्यासह इतर प्राध्यापकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. शोध प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.