*पंढरपूर सिंहगड मध्ये "पीसीबी डिझाईन" कार्यशाळा संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंगळवार दिनांक १२ मार्च २०२३ रोजी "पीसीबी डिझाईन" या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात इनोव्हेशन क्लब अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत प्रा. अविनाश हराळे यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळेस इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग अनेक वेबिनार, कार्यशाळा आयोजित करत असते. या मधुन विद्यार्थ्यांचे टेक्निकल कौशल्य वाढत असते. या कौशल्याचा फायदा विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी तसेच नामांकित कंपनीत प्लेसमेंटसाठी होत असतो असे मत डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी व्यक्त केले.
हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील प्रा. अविनाश हराळे, प्रा. अनिता शिंदे, प्रा. राहूल घोडके, अश्विनी राऊत, स्मिता पिसे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.