*पंढरपूर सिंहगड मध्ये "एस टी एम ३२ अॅण्ड रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टिम" या विषयावर कार्यशाळा संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग व इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर्स (आई.ई.टी.ई) यांच्या संयुक्त विद्यमाने व कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एस टी एम ३२ अॅण्ड रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टिम या विषयावर दिनांक १५ मार्च ते १६ मार्च २०२४ या कालावधीत दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
या कार्यशाळा मध्ये बाळकृष्ण वाघमारे यांनी सध्याच्या युगात रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टिमचे महत्व, एस टी एम चे कार्य, गूगल कोल्याब मध्ये प्रोग्रामिंग कसे करायचे याविषयी प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून दाखवले
दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले की, विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व नोकरीत संधी मिळण्याच्या प्रक्रियेतील एका महत्त्वाचा भाग म्हणून असे कार्यक्रम नेहमीच महाविद्यालयात आयोजित केले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे मत डॉ. कैलाश करांडे यांनी या दरम्यान बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमात द्वितीय व तृतीय वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. अविनाश हराळे, स्वप्नील टाकळे सह विदयार्थी प्रतिनिधी म्हणून संध्या पाटील यांनी जबाबदारी पार पाडली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले .