*उत्तर सोलापूर तालुक्यातील जनतेने मला अनेक वर्षे साथ दिली, यापुढेही प्रणितीताई शिंदेंना सुद्धा साथ द्या :- सुशीलकुमार शिंदे*
*उत्तर सोलापूर तालुक्यातून लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य देणार :- शालिवहन माने देशमुख*
*नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप*
दिनांक : २० मार्च २०२४
उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष शालीवहन माने देशमुख यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केले असून काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांचे नियुक्ती माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना सुशीलकुमार शिंदे साहेब म्हणाले की, उत्तर सोलापूर तालुका माझ्यासाठी नवीन नाही तालुक्याने मला अनेक वर्षे साथ दिली त्यामुळेच मी देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत पोहोचू शकलो मी तुमचे उपकार विसरू शकणार नाही. मला ज्या प्रमाणे साथ दिली त्याच प्रमाणे याही पुढे आमदार प्रणितीताई शिंदे यांना साथ द्यावी असे आवाहन केले. तसेच पुढे बोलताना म्हणाले की आज अनेकांच्या निवडी झाले असून पदे घेऊन घरी बसू नका लवकरच लोकसभा निवडणूक लागणार आहेत मागच्या दोन टर्म प्रमाणे गाफील न राहता सर्वधर्म समभाव माननाऱ्या काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शालिवहन माने देशमुख म्हणाले की, शिंदे साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला असून तो विश्वास सार्थ करून दाखवेन लोकसभा निवडणुकीत उत्तर सोलापूर तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी जिवाचे रान करणार असल्याचे सांगितले. तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडून आणणाच्या निर्धार व्यक्त केला.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, प्रा सिद्राम सलवदे, लक्ष्मण भोसले, भारत जाधव, सुदर्शन आवताडे आदींनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमास जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, सुरेश हसापूरे, अश्फाक बलोरगी, चेतन नरोटे, भारत जाधव, हरिष पाटील, सिद्राम सलवदे, विनोद भोसले, अंबादास करगुळे, सुदर्शन अवताडे, लक्ष्मण भोसले, किसन मेकाले, सचिन गुंड, सागर राठोड, संजय खरटमल, प्रमिला तुपलवंडे, शुभम शिराळ, शंकर मोरे, हणमंतू जाविर, सुशील बंडपट्टे, युवराज जाधव, सचिन पाटील, भीमाशंकर टेकाळे, तात्या कादे ,अतिक काझी, दीनानाथ शेळके, सोमनाथ देसमुख, वैभव घोडके, यांनी संदीप सूरवसे, शकील मौलवी, नंदा कांबळे, अशोक कलशेट्टी, युवराज राठोड यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होत.