स्वेरीमधील शैक्षणीक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो - सहाय्यक व्यवस्थापक विजय पाटील स्वेरीत ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’ विभागाचा पालक मेळावा संपन्न


स्वेरीमधील शैक्षणीक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो   

                                                                 - सहाय्यक व्यवस्थापक विजय पाटील

स्वेरीत ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’ विभागाचा पालक मेळावा संपन्न



पंढरपूर- ‘सोलापूर जिल्ह्यात स्वेरी मधून मिळणारे तंत्रशिक्षण हे वेगळे, शिस्तबद्ध आणि पालक या भुमिकेतून पाहिल्यास महत्वाचे वाटते. विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे आमच्या पाल्यामध्ये असणारे सुप्त गुण जागृत होतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यामुळे साहजिकच आमचे पाल्य भविष्याच्या दृष्टीने करिअर करण्यासाठी सज्ज होऊ लागतात. या कारणांमुळे आम्ही पालक वर्ग आमच्या पाल्याबाबत निश्चिंत असतो. अभ्यासाबाबत स्वेरीतील प्राध्यापकांकडून सातत्याने जो पाठपुरावा होत असतो तो खरोखरच कौतुकास्पद आहे. यामुळे आमच्या पाल्याचा शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकास होतो. एकूणच स्वेरीत नियमित चालणाऱ्या शैक्षणिक उपक्रमामुळे आमच्या पाल्यांचा आत्मविश्वास वाढतो.’ असे प्रतिपादन सोलापूर येथील किर्लोस्कर कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक विजय पाटील यांनी केले.

          गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे ‘पालक मेळावा’ आयोजित केला होता. याप्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून किर्लोस्कर कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक विजय पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ.कल्पना विजापुरे ह्या उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनानंतर विभागप्रमुख डॉ.एस. बी. भोसले यांनी पालकांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायात करिअर करावे. आपण स्वतः नोकरी मिळविण्यापेक्षा इतरांना नोकरी कशी देता येईल याकडे लक्ष द्यावे. यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना प्रोत्साहीत करावे.’ असे सांगून विभागामध्ये घेतले जाणारे विविध शैक्षणिक उपक्रम, महाविद्यालयाला मिळालेली मानांकने व त्यांचे महत्व, पेटंटस, वर्षाचा नियोजित केलेला अभ्यासक्रम व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा आढावा याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्लेसमेंट विभागाचे प्रा.अविनाश मोटे पालकांशी सुसंवाद साधताना अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या गेट परीक्षेबाबत मार्गदर्शन केले तसेच स्वेरी कॉलेजमध्ये येणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांबद्दल आणि प्लेसमेंट विभागाच्या कार्याबाबत माहिती दिली. यावेळी पांडुरंग आसबे यांच्यासह काही पालकांनी आपले विचार मांडले. यावेळी कृष्णदेव नागनाथ ढेकळे यांनी आपले पाल्य एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागल्यामुळे आनंदी होऊन त्यांनी विभागप्रमुख डॉ. भोसले यांचा विशेष सत्कार केला. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेला हा पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रा.डी. टी. काशीद, प्रा.पी. बी. आसबे, प्रा.ए.के.पारखे यांच्यासह इतर प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्ह्यातील जवळपास २०० पालक, तसेच स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रशासन अधिष्ठाता डॉ.आर.आर.गिड्डे, संशोधन अधिष्ठाता डॉ.ए.पी.केने, डॉ. हर्षवर्धन रोंगे यांच्यासह विभागातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा. एस. वाय. साळुंखे यांनी केले तर इंटर्नल क्वालिटी अशुरन्स सेलचे समन्वयक डॉ. एस. एस. वांगीकर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad