लोकसभा निवडणुकीला आरपीआय वेगळा विचार करेल असा सूचक इशारा माढा तालुकाध्यक्ष मा.मारूती राया वाघमारे यांनी भाजपला दिला

 लोकसभा निवडणुकीला आरपीआय वेगळा विचार करेल असा सूचक इशारा माढा तालुकाध्यक्ष मा.मारूती राया वाघमारे यांनी भाजपला दिला 

माढा प्रतिनिधी 



नुकतीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. परंतु अजूनपर्यंत महायुतीमध्ये जागा वाटपाचे खलबते सुरूच आहे. यामध्ये आरपीआय चे पक्षाचे सर्वेसर्वा तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी अद्यापही भाजपने एकही जागा न सोडल्याने रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. सुरुवातीपासूनच ना. रामदास आठवले यांनी लोकसभेसाठी रिपब्लिकन पक्षाला शिर्डी व सोलापूर या दोन जागा सोडाव्या अशी आग्रही मागणी केली होती. परंतु आजतागायत भाजपने महायुतीतील जुना मित्र पक्ष असलेल्या आरपीआय ला जागा सोडण्याबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने भाजप आता युतीधर्म पाळत नसल्याने जागा न सोडल्यास लोकसभा निवडणुकीला आरपीआय वेगळा विचार करेल असा सूचक इशारा माढा तालुकाध्यक्ष मा.मारूती राया वाघमारे  यांनी भाजपला दिला आहे. 



ना. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाची महाराष्ट्रातील ताकद व जनाधार बघता भाजपने आठवले यांना २०१४ साली सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. परंतु आता महायुतीत नवीन मित्र पक्ष सामील झाल्याने जुना मित्र पक्ष आरपीआय ला विसरली आहे. गेली १० वर्षे आरपीआय (आठवले) पक्षाने युतीचा धर्म पाळून प्रामाणिकपणे काम केले आहे. तरीसुद्धा जागा वाटपात आरपीआय पक्षाला भाजप जाणीवपूर्वक डावलत असल्याने महाराष्ट्रातील आरपीआय आठवले पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले असल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे भाजपने व महायुतीने हि गंभीर बाब लक्षात घेऊन आरपीआय आठवले पक्षाला शिर्डी व सोलापूर अशा दोन जागा लोकसभेसाठी सोडाव्या तसेच युतीचा धर्म पाळून आरपीआय पक्षाचा योग्य तो मान सन्मान करावा अन्यथा महाराष्ट्रात वेगळी भूमिका घ्यावी लागेल असेही माढा तालुक्याच्या वतीने राया वाघमारे यांनी भाजपला कडक शब्दांत फटकारले आहे. जागा न सोडल्यामुळे ना. रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाने लोकसभेला वेगळी भूमिका घेतल्यास भाजपला आंबेडकरी मतांवर पाणी सोडावे लागेल आणि भाजपला हि धोक्याची घंटा असून हे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे भाजप आरपीआय च्या मागणीचा विचार करणार का ? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad