पंढरपूर सिंहगड कॉलेजमध्ये सोलार बेस्ट बिजनेस प्लॅन स्पर्धा उत्साहात संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये आदित्य २के२४ या भव्य आणि दिव्य कार्यक्रमानिमित्त बेस्ट बिजनेस सोलर प्लॅन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होते. सदर स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती सिंहगड कॉलेजची प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, यांच्या हस्ते करण्यात आले.
कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या सोलर प्लांटच्या बद्दल असणाऱ्या प्रोजेक्टची माहिती थोडक्यात दिली तसेच उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं
या स्पर्धेमध्ये ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक अजिंक्य पवार, रोहन नलावडे तर द्वितीय क्रमांक सौरभ जानकर, संकेत कदम यांना मिळविला.
यावेळी डाॅ. बाळासाहेब गंधारे, प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. मनोज कोळी, प्रा. सचिन घाडगे सह इव्हेंट मुख्य कॉर्डिनेटर सचिन सावंत तसेच रोहन नलावडे, सौरभ जरे, अग्रज शिंगाडे, ऐश्वर्या जाधव, दिगंत गव्हाणे, अनुजा पवार आदी कॉर्डिनेटर सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.