*भोसे योजनेच्या दुरुस्तीसाठी टंचाई आराखडयामधून मधून 29 लाख मंजूर - समाधान आवताडे*
मंगळवेढा : तालुक्यातील 39 गावाची तहान भागवणाय्रा भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी टंचाई आराखडयामधून 29 लाख 49 हजार 792 रुपये मंजूर केल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली.
ऐन उन्हाळ्यात दक्षिण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्यामुळे आ. समाधान आवताडे यांनी जोगेश्वरी मंगल कार्यालयात टंचाई आराखड्याची बैठक घेतली होती. त्या बैठकीत सध्या या भागातील विंधन विहीर,
विहिरींच्या पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे या भागातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाले त्यांना पाण्याचा स्त्रोत नाही या योजनेत असणाऱ्या गावांना टँकरही दिले जात नाहीत त्यामुळे वारंवार बंद पडत असलेल्या योजनेबाबत तक्रारी या भागातील सरपंचांनी केल्यानंतर
या योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा तसेच ज्या वाडी वस्तीवर या योजनेची पाणी पोहोचले नाही त्या वाड्या वस्त्यांवर टँकर मंजूर करावा म्हणून जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 29 लाख 49 हजार 792 रुपये मंजूर केले असून कार्यरंभ आदेशानंतर 45 दिवसात काम पूर्ण करण्याचा सूचना प्रशासनास दिल्या.
या मंजूर रकमेमधून पाण्याची होणारी गळती कमी करणे,खराब पाईप दुरुस्ती करणे,नादुरुस्त इयर वॉल बदलणे, ही कामे करण्यात येणार आहेत त्याचबरोबर ही कामे करत असताना सदर काम व्यवस्थित करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची असून या योजनांची पाहणी उपविभागीय अधिकारी,
संबंधित गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी स्वतः जाऊन करून काम व्यवस्थित व चांगल्या दर्जाचे करून घ्यायचा सूचना त्यांना दिल्या आहेत.सध्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे तीव्र पाणीटंचाई भासत असून हा निधी मंजूर झाल्यामुळे लवकरच या योजनेची दुरुस्ती होऊन व्यवस्थित पाणी मिळेल असे आ. समाधान आवताडे यांनी सांगितले.