*पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात सोमवार दिनांक २५ मार्च २०२४ रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या पालक मेळाव्याचे उद्घाटन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी प्रा. अविनाश हराळे, पालक प्रतिनिधी राजेंद्र मोकाशी आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यादरम्यान इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचा शैक्षणिक आढावा विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी प्लेसमेंट विषयी मार्गदर्शन केले.
या पालक मेळाव्यात सहभागी झालेल्या पालकांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.