*पंढरपूर सिंहगड मध्ये उद्योजक कार्यशाळेचे आयोजन*
तीन दिवशीय कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी "उद्योजकता विकास" या विषयावर तीन दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली असुन या कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होणार असल्याची माहिती डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी दिली.
या कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. एस. ए. जेऊरकर, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. बाळासाहेब गंधारे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. बाळासाहेब गंधारे यांनी केले. महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख व्याख्याते प्रा. एस. ए. जेऊरकर यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रा. एस. ए. जेऊरकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हि कार्यशाळा शुक्रवार दिनांक १५ मार्च २०२४ ते १७ मार्च २०२४ या कालावधीत संपन्न होणार आहे. यामध्ये प्रा. एस. ए जेऊरकर, डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, प्रा. नितिन खपाले, प्रा. धनंजय गिराम, उद्योजक सुरज डोके, प्रा. अर्जुन मासाळ आदींसह अनेकजण मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेत महाविद्यालयातील ७५ हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. हि कार्यशाळ यशस्वी करण्यासाठी कार्यशाळेचे समन्वयक प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. सचिन घोडके, प्रा. नितिन खपाले, प्रा. मनोज कोळी, संध्या शिंदे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग परीश्रम घेत आहेत.