पंढरपूर सिंहगडला "डिपेक्स प्रकल्प प्रदर्शन" मध्ये प्रथम क्रमांक*

 *पंढरपूर सिंहगडला "डिपेक्स प्रकल्प प्रदर्शन" मध्ये प्रथम क्रमांक*



पंढरपूर: प्रतिनिधी



तरेणा अभियांत्रिकी महाविद्यालय नेरूळ, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय "डिपेक्स प्रकल्प प्रदर्शन" मध्ये पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक प्राप्त केला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   मुंबई येथे घेण्यात आलेल्या डिपेक्स प्रकल्प प्रदर्शनाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंञी चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी ए. राजाराजन, आमदार राणाजगनितसिंह पाटील, मधुसूदन अग्रवाल, यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या "डिपेक्स प्रकल्प प्रदर्शनात" एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय शिक्षण घेत असलेले सोहम मोदी, श्रद्धा कुलकर्णी, प्रगती भगत, प्रांजली बेद्रे, वरदा बिडकर आणि विशाल मिसाळ या विद्यार्थ्यांनी "हाय इफिसिंयंट लाईट वेट डयुल ॲक्सीयल वाईड टर्बाईन" (एनर्जी सेक्शन) या विषयावर प्रकल्प सादर केला होता.

     या प्रकल्प प्रदर्शन मध्ये महाराष्ट्र सह गोवा राज्यातील महाविद्यालयातील १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यामधून २८० प्रकल्पाची निवड करण्यात आली होती. यामधुन पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या डिपेक्स मधील ऊर्जा प्रकल्पास प्रथम क्रमांक प्राप्त मिळाला आहे. 

    हा प्रकल्प तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad