मतदार संघातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अडीचशे कोटीची कामे प्रस्तावित - आ. आवताडे*

 *मतदार संघातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अडीचशे कोटीची कामे प्रस्तावित - आ. आवताडे*



प्रतिनिधी

भारत सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS)अंतर्गत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये वीज वितरणच्या कामासाठी 250 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली असून यातील काही कामे मंजूर झाली असून त्यातील काही कामांना सुरुवात झाली आहे उर्वरित प्रस्तावित कामेही लवकरच मंजूर होणार असून मतदारसंघातील विजेचा प्रश्न सुरळीत होणार आहे यामध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे,क्षमता वाढवणे, डीपीची क्षमता वाढवणे, जुन्या विद्युत लाईन नुतनीकरण करणे अशी कामे या निधीतून करण्यात येणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी नंदुर येथे बोलताना सांगितले .



ते नंदुर येथे 33kv नवीन सर्व स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य रावसाहेब राजमाने रमेश भांजे,चनबसू येनपे,गंगाधर काकणकी पावले सर,सुमनताई गोडसे ,कव्हाप्पा बगले, गुरप्पा स्वामी,परमेश्वर एनपे, श्रीशैल्य गोडसे,आमकगोडा भांजे, सचिन चौगुले,स्वामी मेजर ,राजकुमार मणगेनी, विठ्ठल केदार, शंकर संगशेट्टी आदि ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ समाधान आवताडे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील विद्युत वितरण प्रणाली सुधारण्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजना राबविण्यात आली आहे त्यांचा या संकल्पनेतून सोलर सिस्टिम व नवीन उपकेंद्रांची वाढ तसेच नूतनीकरण करण्यात येत आहे या योजनेमधून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये नंदुर,लक्ष्मी दहिवडी व मंगळवेढा शहरासाठी नवीन 33 केव्हीची उपकेंद्र मंजूर झाली आहेत तर सोडडी,शिरसी,मारोळी, गोपाळपूर ,शिरगाव ,कासेगाव येथे चौथा मैल, पंढरपूर शहर या ठिकाणी नवीन 33 केव्ही उपकेंद्र प्रस्तावित केली आहेत त्याचबरोबर ११ सबस्टेशनची क्षमता वाढवण्यात येणार आहे मतदारसंघांमध्ये ६३ केव्हीचे १२३ नवीन ट्रांसफार्मर, १०० केवी क्षमतेचे ५८५ तर २०० केव्हीचे ८ ट्रांसफार्मर असे मिळून एकूण ७१६ ट्रान्सफॉर्मर प्रस्तावित केले असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल त्याचबरोबर ६३ केव्हीचे १०० केव्ही क्षमता वाढवण्यासाठी ३१६ ट्रान्सफॉर्मर प्रस्तावित केले आहेत तसेच मतदारसंघात ११ केव्हीची ३४ किलोमीटर लिंक लाईन तर ३३ केव्हीची २८ किलोमीटर नवीन लिंकलाईन करण्यात येणार आहे त्याचबरोबर जिल्हा नियोजन मधून  सन २२-२३ ते २३-२४ या वर्षांमध्ये १०३ इतके ट्रान्सफॉर्मर मंजूर केले असून कामे प्रगतीपथावर आहेत वारंवार लाईट जाणे,कमी होल्टेज येणे अशा अनेक तक्रारी घेऊन शेतकरी माझ्याकडे येत होते या तक्रारी निवारणासाठी 250 कोटीच्या निधीची तरतूद केली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नवीन वीज कनेक्शन भरून घेतली तरच तेथील डीपीवरील ओव्हरलोड समजणार आहे व तात्काळ नवीन डीपी साठी मंजुरी मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन भरावीत.मंजूर डीपी बसविताना कोणी ठेकेदार अथवा अधिकारी पैसे मागत असेल तर मला संपर्क साधा. लवकरच सर्व कामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा सुरू होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.




फोटो-- नंदूर येथे नवीन सब स्टेशनच्या कामाचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad