सौभाग्यवती तृप्ती ताई खरे, यांच्या उपस्थित चळे ता. पंढरपूर येथे महिला दिन उत्साहात साजरा

 सौभाग्यवती तृप्ती ताई खरे, यांच्या उपस्थित चळे ता. पंढरपूर येथे महिला दिन उत्साहात साजरा 

मोठ्या प्रमाणात महिलांच्या कार्यक्रमाला प्रतिसाद*



पंढरपूर प्रतिनिधी 

२४७ मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजू खरे साहेब यांच्या सौभाग्यवती तृप्ती ताई खरे, यांच्या उपस्थित चळे ता. पंढरपूर येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. चळे ता. पंढरपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री दर्लिंग प्रशाला व भास्कर आप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम ाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा या स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजू खरे साहेब यांच्या पत्नी सौ समाजसेविका तृप्ती ताई खरे यांच्या हस्ते करण्यात आले. तृप्ती ताई बोलताना म्हणाल्या सर्वत्र महिला सक्षम आहेत. आज बघताय जगात महिला कुठे कमी नाहीत. कारण डॉक्टर, वकील, शिक्षक पोलीस, एसटी ड्रायव्हर कंडक्टर, राजकीय क्षेत्रात मोठमोठ्या पदावर महिला आहेत. त्यामुळे महिलांनी कुठे स्वतःला कमी समजू नये प्रत्येक महिलाही कलागुणांनी संपन्न असतेच त्यांना


आपल्या कलागुणाच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी फक्त एक सुसंस्कृत व हक्काचे व्यासपीठ हवे असते. मुलींनी ही चांगले शिक्षण घेऊन आपल्या आई-वडिलांचे नाव कमवावे कारण म्हणतात ना मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी आपला अभ्यास वेळेत पूर्ण करावा आणि चांगली मार्क मिळावेत असे प्रयत्न करा. तृप्ती खरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. प्रथम त्यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शालन ज्ञानेश्वर शिखरे, यांनी भूषवले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका भुसे मॅडम, यांनी केले. या कार्यक्रमास प्राचार्य जे बी गायकवाड, गोपाळपूरच्या उपसरपंच उज्वलाताईबनसोडे, मा. सरपंच वंदना सोनटक्के, जिजाऊ ग्रामीण महिला पतसंस्थेच्या चेअरमन चंद्रभागा घाडगे, सारिका वाघ, दिपाली गायकवाड, अबिनी वाघ, डॉ. वैशाली गायकवाड, स्मृति मोरे, पुनम मोरे, आर पीआय कार्याध्यक्ष विजय वाघमारे, ज्ञानेश्वर शिखरे, लखन वाघमारे विद्यार्थी आणि महिला शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad