*पंढरपूर सिंहगडच्या प्रशांत चौगुले यांची महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसर पदी निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून २०१९ मध्ये अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केलेले ईश्वर वठार, पंढरपूर येथील कुमार प्रशांत लहू चौगुले यांची नुकतीच महाराष्ट्र ग्रामीण बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
देशातील व परदेशातील नामांकित कंपन्यांना आवश्यक असलेले परफेक्ट इंजिनिअर हे पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये घडविले जातात. कंपनीला आवश्यक असलेले ज्ञान, गुण यांचा समन्वय साधून महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण व प्लेसमेंट ची तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. यामुळेच पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील विद्यार्थी विविध क्षेत्रात मुलाखती देण्यासाठी सक्षम होऊन यशस्वी होत आहेत.
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून शिक्षण घेऊन ऑक्टोबर २०२३ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला जवळपास ८ लाख विद्यार्थ्यांकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून घेण्यात आलेल्या मुलाखतीतून कुमार प्रशांत लहू चौगुले यांची प्रोबेशनरी ऑफिसर पदी निवड झाली असुन प्रशांत चौगुले यांना मासिक ७२ हजार इतका पगार भेटणार आहे. यापूर्वी प्रशांत चौगुले हे आय डी बी आर (इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) मध्ये कार्यरत होते.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून प्रशांत चौगुले यांची निवड झाल्याबद्दल काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डॉ. श्याम कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.