*ब्रँच कोणतीही असो तुमचे स्कील तुम्हास घडवत असते- डाॅ. कैलाश करांडे*
पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना अभ्यासाशिवाय इतर गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पालक व शिक्षकांची आहे. महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या विविध स्पर्धेतुन अनेक विद्यार्थी घडत असतात त्यातुन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असते. सद्याचा काळ खुप वेगळा आहे. ब्रँच कोणतीही असो तुमचे स्कील तुम्हास घडवत असते. पहिल्या वर्षी विद्यार्थी अभ्यासाला महत्व देत असतो. द्वितीय वर्षापासून विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा असतो. चार वर्षांत मेहनत घेतली तर भविष्यातील आवाहने आपण सहज पेलू शकाल. महाविद्यालयाने आयोजित कार्यक्रमात पालकांची उपस्थिती असणे आवश्यक आहे. नवनवीन शैक्षणिक धोरण सातत्याने बदल करण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील असुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मत डॉ. कैलाश करांडे यांनी यादरम्यान बोलताना व्यक्त केले.
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात सोमवार दिनांक २५ मार्च २०२४ रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या पालक मेळाव्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विनोद मोरे, पालक प्रतिनिधी प्रा. महादेव जेधे, प्रा. अंजली चांदणे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विनोद मोरे यांनी स्क्रीन द्वारे उपस्थित विद्यार्थी व पालक यांच्या समोर वार्षिक आढावा मांडला.
दरम्यान पालक प्रतिनिधी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर बोलताना म्हणाले, महाविद्यालय विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध करून देत आहेत. अशा संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. असे मत डॉ. समीर कटेकर यांनी बोलताना व्यक्त केले.
पालक प्रतिनिधी प्रा. महादेव जेधे बोलताना म्हणाले, स्पर्धा खुप आहे पण या स्पर्धेत तुम्ही कष्ट घेतले तर उज्ज्वल यशाचे शिखर गाठू शकतात. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येत असतात. ध्येय नेहमी मोठे ठेवले पाहिजे. आयुष्यात येणारी आव्हाने विद्यार्थ्यांनी दाकदीने लढली पाहिजेत. विद्यार्थ्यांकडे क्वालिटी असेल तर नोकरी भेटणारच. अभ्यासाला वेळ द्या. शरीराकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षण घेत असताना आजारी पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत प्रा. जेधे यांनी मत व्यक्त केले.
या मेळाव्याचे सुञसंचालन कुमारी अनिष्का राऊत यांनी केले तर उपस्थितांचे आभार कुमारी श्रद्धा पंधे हिने मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.