*सिंहगड कॉलेज मधील विद्यार्थ्यांची पंढरपूर रेल्वे स्टेशन नेटवर्क सेंटर ला भेट*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी पंढरपूर रेल्वे स्टेशन नेटवर्क सेंटर येथे भेट दिली असल्याची माहिती कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी दिली.
काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय वर्षांतील विद्यार्थ्यांची पंढरपूर रेल्वे स्टेशन नेटवर्क सेंटर येथे इंडस्ट्रियल भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीमध्ये रेल्वे नेटवर्क काम कसे करते आणि नेटवर्कच्या विविध प्रकाराबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. या इंडस्ट्रियल व्हिजिटमध्ये ७७ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
ही भेट यशस्वी करण्यासाठी प्रा. संदीप लिंगे, प्रा. बाळकृष्ण जगदाळे, प्रा. धनश्री भोसले आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.