नदीकाठच्या गावांचा वीजपुरवठा आज सायंकाळपासून सुरळीत होणार- आ समाधान आवताडे*

 *नदीकाठच्या गावांचा वीजपुरवठा आज सायंकाळपासून सुरळीत होणार- आ समाधान आवताडे*



उजनी धरणातून सध्या पिण्यासाठी भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले असून पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेपर्यंत नदीकाठच्या गावचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता हे पाणी सध्या हिळळी बंधाऱ्यात पोहोचले असून तात्काळ वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी सूचना आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिल्यानंतर कुमार आशीर्वाद यांनी आज सायंकाळपासून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.

सध्या नदीत पाणी असूनही वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते,शेतात असलेली उभी पिके डोळ्यासमोर वीज नसल्याने जळून चालली होती,केवळ दोनच तास वीज पुरवठा सुरू असल्यामुळे शेतात पाणी येण्याअगोदर वीज बंद होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते,त्यामुळे नदीकाठचे शेतकरी वीज पुरवठा सुरळीत करण्या संदर्भात वारंवार मागणी करत होते त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना बोलून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे आज सोमवारी सायंकाळपासून वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याचे आ समाधान आवताडे यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad