टक्केवारी चे राजकारण मी करत नाही कारण मी ठेकेदार नाही- प्रणिती शिंदे*

 *टक्केवारी चे राजकारण मी करत नाही कारण मी ठेकेदार नाही- प्रणिती शिंदे*



लक्ष्मी दहिवडी:

शेतकऱ्यांच्या समस्या तसेच या भागातील पाणी टंचाई याबद्दल मी खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत राहणार आहे. स्व. भारत नाना भालके यांनी जे काम केले तसेच काम  इतर कोणी पुढे नेऊ शकले नाही. पाणी प्रश्नांवर मी शासन दरबारी आवाज उठवला आहे. मी जातीचे राजकारण करत नाही. मी जात पात मान नाही. धर्म जेवढा महत्वाचा तेवढे कर्म महत्वाचे आहे. ज्यांचे राज्य आहे ते तुम्हास ५०० कोटी देऊ शकले नाहीत. आमदारांना द्यायला पैसे आहेत पण मंगळवेढा उपसासिंचन साठी पैसे नाहीत. या मतदारसंघातील जनतेने दोन वेळेस विश्वास दिला पण जनतेच्या पदरी निराशाच पडली. या भागात रोजगार भेट नाही, रेशन दुकानात धान्य भेटत नाही.  विश्वासाने मला काम सांगा तो विश्वास मी कामातुन देणार आहे. लोकांमध्ये जाऊन आपण काम करणार आहे. लोकशाही टिकविण्याची एकञ या. शेतकऱ्यांचा विजय होणेसाठी एकञ या. मन परिवर्तन झाले आहे पण मत परिवर्तन झाले पाहिजे. स्वतःसाठी व देशासाठी विचार करा. महिलांवर अन्याय करणाऱ्या मोदी सरकार करत आहे. महिलांकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार आहे. आपला महाराष्ट्र हा महापुरुषांचा वारसा असलेले देश आहे. काँग्रेसचे योजना भाजप राबवत आहे. जे जुन आहे तेच आता हे सरकार करत आहे. मी टक्केवारी चे राजकारण करत नाही. कारण मी ठेकेदार नाही. असे मत गावभेट दौऱ्यात लक्ष्मी दहिवडी येथे बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले. 



 लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथे शनिवार दिनांक ९ मार्च रोजी गावभेट दौऱ्यात आमदार प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळेस शेलार शेळके, कैलास मसरे, स्वप्नाली भगत, विद्या कडलासकर यांनी मनोगत व्यक्त केले.

  या दौऱ्यात मनोज माळी, अँड. रवि कोळेकर, गणपत बनसोडे, हणमंत क्षीरसागर, अनिल आदलिंगे, अविनाश बनसोडे, नागेश कुभार, अवधूत घोडके, सचिन बोडके, भिमराव पाटील, मनोहर पाटील आदींसह बचत गट महिला सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अर्जुन सोनवले यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad